- FACULTY OF LANGUAGES & LITERATURE
Department of Marathi
Established in 1962, the Department of Marathi has been dedicated to preserving and advancing the rich literary heritage of Marathi through innovative academics, skill-based programmes, research initiatives, and vibrant cultural engagement.
Overview
१९६२ साली पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाची स्थापना झाल्यापासून मराठी भाषेची समृद्ध व वैभवशाली परंपरा जतन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मराठी विभागामार्फत सातत्याने केले जात आहे. सुदृढ शैक्षणिक पार्श्वभूमी असलेला पात्र शिक्षकवर्ग, नामांकित संस्थांशी शैक्षणिक सहकार्य, गोमंतकीय मराठी साहित्याच्या अभ्यासावर विशेष भर, विभागीय प्रकाशने तसेच कौशल्याधारित अभ्यासक्रम ही या विभागाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
स्थापनेपासूनच विभागाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात गोमंतकीय मराठी साहित्याचे सादरीकरण व लोकप्रियता वाढविण्याकरिता तसेच या साहित्याच्या अभ्यास व संशोधनाला चालना देण्याकरिता आजवर अनेक गोमंतकीय मराठी साहित्यावरील राष्ट्रीय चर्चासत्रांची मालिका आयोजित करणे, पत्रकारिता क्षेत्रातील कुशल वृत्तलेखकांची वाढती गरज लक्षात घेऊन पत्रकारिता विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणे,पदवीधर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी पटकथालेखनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणे तसेच ‘मराठी विभाग प्रकाशन’ या नावाने स्वतःचे अंतर्गत प्रकाशन सुरू करणे यासारखी महत्त्वपूर्ण कार्ये विभागाने केलेली आहेत. त्याचमुळे पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाचचा मराठी विभाग आज एका वेगळ्या उंचीवर विराजमान झालेला दिसून येतो.
विद्यार्थीकेंद्री विभाग म्हणून ओळख असलेला मराठी विभाग विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता उंचाविण्याकरिता नेहमीच प्रयत्नशील असतो. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची रचना करणे आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करणे असे प्रयोग विभागाद्वारे केले जातात. नवीन शिक्षण प्रणाली २०२० ला केंद्रवर्ती ठेवून पदवीधर स्तरावर मेजर विषय (Major Course), मायनर विषय (Minor Course), बहुविषयक अभ्यासक्रम (Multidisciplinary Course), कौशल्य वृद्धी अभ्यासक्रम (Skill Enhancement Course), क्षमता वृद्धी अभ्यासक्रम (Ability Enhancement Course) तसेच मूल्यवर्धित अभ्यासक्रम (Value Added Course) अशा बहुआयामी अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांच्या साहित्यिक तसेच सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी विभाग विविध उपक्रम राबवितो. यामध्ये साहित्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची व्याख्याने, अभ्यास दौरे, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा (सप्तरंग कलास्पर्धा), राज्यस्तरीय कला व साहित्य महोत्सव (नवांकुर कलामहोत्सव), वाचक गटांतर्गत साहित्यिक उपक्रम (पार्वतीबाई वाचन मंदिर), कविता वाचन (श्रवणधारा) इत्यादींचा समावेश आहे.
मराठी विषयातील पदवीधर विद्यार्थ्यांकडून समाजाच्या अपेक्षा पूर्ण होतील, असे दर्जेदार शिक्षण देण्यास विभाग कटिबद्ध आहे. विभागाद्वारे पुरविण्यात येणारे शिक्षण, विविध उपक्रम व कौशल्याधारित अभ्यासक्रम यांच्या माध्यमातून गोवा राज्यातील उत्कृष्ट मराठी विभागांपैकी एक म्हणून मराठी विभागाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Vision
lorem
Mission
पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयातील मराठी विभाग, मराठी विषयातील पदवीधर विद्यार्थी घडवताना विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम साहित्य: वाचन, लेखन व संशोधनविषयक जाणीव निर्माण करून भाषिक कौशल्ये विकसित करण्याचे धोरण अंगिकारतो.
वरील कौशल्ये आत्मसात करून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांने नावलौकिक संपादन करावा हा हेतू समोर ठेऊनच अभ्यासक्रमाचे नियोजन केलेले आहे. काव्यशात्र, साहित्याचे प्रकार व उपयोजन, व्याकरण व भाषाशात्र यासारख्या अनिवार्य विषयांबरोबरच गोमंतकीय मराठी साहित्य: समीक्षा आणि संशोधन, गोमंतक आणि कोकण या प्रदेशातील लोककला, आधुनिक मराठी साहित्यप्रकार (ललित निबंध, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, प्रादेशिक कादंबरी), साहित्याभिरूचीचे स्वरूप, कार्यक्रम संयोजन आणि संचालन कौशल्य, भाषांतर विद्या, पटकथालेखन यासारख्या विषयांचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव वरील उद्दीष्टांच्या पूर्तीसाठी करण्यात आलेला आहे.
विभागामध्ये मराठी भाषा व साहित्य, गोमंतकीय मराठी साहित्य, लेखनकौशल्ये, प्रसारमाध्यमांसाठी लेखन या क्षेत्रातील अनुभवी शिक्षकवर्ग कार्यरत आहेत. सामंजस्य करारांतर्गत शैक्षणिक व सांस्कृतिक आदानप्रदान केले जाते. गोवा मराठी अकादमी, रवींद्र भवन, मडगाव यासारख्या संस्थांचा सहयोग लाभतो. अध्यापनामध्ये स्वाध्याय, गटचर्चा, स्वयंअध्ययन, दृक् श्राव्य सादरीकरण इ. आधुनिक कौशल्यांचा समावेश केला जातो.
नियोजित व्याख्यांनासोबतच ‘सप्तरंग’, ‘नवांकुर’ यासारख्या साहित्य आणि कला यांचे जोपासन करणाऱ्या कलामहोत्सवातून तसेच लेखकांशी संवाद, मान्यवरांची व्याख्याने, वाचक गटांतर्गत केले जाणारे विविध उपक्रम या सर्वातून विद्यार्थांमध्ये संयोजन, वाचन, लेखन, वक्तृत्त्व, सादरीकरण यासारख्या कौशल्यांच्या विकासामध्ये मदद केली जाते. कथा, कविता व ललित निबंध लेखन या विषयी मार्गदर्शन केले जाते त्यामुळे साहित्यविषयक जाणिवांच्या विकासामध्ये भर पडते.
गोमंतकीय मराठी साहित्यावरील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चर्चासत्रांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोमंतकीय मराठी साहित्याच्या वाचनाची व त्यावरील संशोधनाची आवड निर्माण केली जाते. प्रकल्प कार्य, शोधनिबंध, आणि ग्रंथ संपादन याविषयीची माहिती दिली जाते व प्रास्ताविक स्वरूपात त्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यात येते.
विद्यार्थ्यांचा भाषा आणि साहित्य या विषयाचा सर्वांगीण अभ्यास होईल त्यामुळे साहित्याबाबतीत असलेली मुख्य कौशल्ये ते आत्मसात करतील. साहित्याचे परीक्षण, वाङ्मयीन सिद्धांत आणि संशोधन या बाबतीतला दृष्टीकोन विकसित होईल.
पूरक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध प्रसार माध्यमे, मुद्रित शोधन, जाहिरात लेखन, मुलाखत लेखन, निमंत्रणपत्रिका, स्मरणिका व गौरविका इ. माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार संधी उपलब्ध होतील.
मराठी भाषेचे ज्ञान असलेला कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र आहे. मराठी भाषा, साहित्य व संशोधन क्षेत्रामध्ये कार्य करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच भाषा, साहित्य, कला पूरक अभ्यासक्रमाची आवश्यक असणाऱ्या इतर नागरिकांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल.
Activities Organised
- श्रावणधारा
- पार्वती वाचन मंदिर
- नवांकुर
- मराठी भाषा दिवस
- न्यूज लेटर
- बीओ एस (BOS) मीटिंग (02)
- भाषंतर कार्यशाला
- रांगोळी कार्यशाळा
- तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील मराठी वेबिनार
Teaching & Learning method
- व्याख्यान पद्धती
- दृक्-श्राव्य सादरीकरण
- विचारमंथन
- लघुपट व जाहिरात निर्मिती
- माहितीपट
- मुलाखत
- गट-चर्चा
- रोल प्ले
- गुगल क्लासरूम
- वादविवाद पध्दत.
- प्रकल्प पध्दती
- अनुभवाधारित शिक्षण पद्धती
Best Practices
- बातमीपत्र तयार करणे
- चाय-पे चर्चा
- जाहिरात निर्मिती
- स्वॉट अनालाइसिस
- माहितीपट निर्मिति
- पथनाट्य सादरीकरण
- एकांकिका सादरीकरण
- कविता लेखन आणि प्रस्तुतीकरण
- ब्लॉग लेखन
- भाषांतर
- तृतीय वर्ष कला – शोध प्रकल्प
- कार्यशाळा
- अतिथि व्याख्यान
Alumni
- Shriya Tengse
2019-20
Govt. College of Arts, Commerce & Science, Sanquelim
Assistant Professor in Marathi
(Regular) - Vaishnavi Pai Kakode
2017-18
Directorate of Art & Culture, Govt. of Goa - Sonia Sawant
2013-14
Govt. College of Arts, Commerce & Science, Quepem
Assistant Professor in Marathi
- Ugam Parab
2013-14
Government college Khandola
Assistant Professor in Marathi - Ravina Kurtarkar
2013-14
Daily Pudhari
Journalist - Tejal Mahale Borkar
2020-21
NIT Goa
Translator - Akanksha Raikar
2023-24
Assistant Professor
- Akanksha Raikar
2023-24
Assistant Professor